
पुण्याहून संभाजीनगरला पाठविलेल्या पार्सलमधील 14 मोबाइल चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत नेताजी परीट (34, रा. लोणीकंद) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोणीकंद भागातील एका खासगी इलेक्ट्रॉनिक कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला आहेत. त्यांच्या कंपनीने संभाजीनगर येथील एका व्यापार्याला मोबाइल असलेले पार्सल पाठविले होते. त्यापैकी एका पार्सलचे ‘सील’ तोडून चोरट्याने त्यातील 14 मोबाइल पळवून नेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस अंमलदार सागर जगताप पुढील तपास करीत आहेत.






























































