अॅसिड फेकण्याची धमकी देत केला बलात्कार, नंतर तिला ढकलले कॅनोलमध्ये 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ओळखीतील महिलेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध निर्माण करून तिच्यावर अत्याचार केल्याच घटना घडली आहे. आरोपीने महिलेला कॅनोलमध्ये ढकलून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला

याप्रकरणी आनंदा पाटील (वय 56, रा. जनता वसाहत) याच्यावर बलात्कार, खूनाचा प्रयत्न तसेच विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  38 वर्षीय पिडीत महिलेने तक्रार दाखल केली आहे.

पिडीत महिला आणि आरोपी यांची 2019 पासून ओळख झाली होती. ओळखीतून आनंदाने महिलेला  वेगवेगळ्या ठिकाणी नेउन जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास अ‍ॅसिड फेकून कुटूंबाला मारण्याची धमकी दिली.  महिलेला स्वारगेट परिसरातील  लॉजवर  नेउन जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्याचदरम्यान त्यांना पतीचे फोन येऊ लागल्यामुळे  महिलेने घरी जाण्याचा प्रयत्न केला.

काही वेळानंतर आनंदा  महिलेला लॉजवरून घेऊन जनता हॉलसमोर आला. त्याठिकाणी त्याने पीडितेला कॅनोलमध्ये ढकलून देत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला जखमी झाली. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी दिली.