
हडपसर भागात मोटारीचे सायलेन्सर चोरुन धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला युनिट पाचने अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 सायलेन्सर, दुचाकी असा दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विनय ललीत चव्हाण (वय – 20, रा. गजानन मंदिराजवळ, गजानन हाईटस, फुरसुंगी) याच्यासह दोन विधी संघर्षित बालकांना अटक केली आहे.
युनिट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सायलेन्सर चोरीतील आरोपी हडपसर परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने विनयला ताब्यात घेतले. त्याने कोंढवा येथे राहणारा भंगार खरेदी विक्री करणारा तलहा आयुबअली मलीक (वय – 24, वर्षे, रा. सागर कामठेनगर, कोंढवा, पुणे) याला सायलेन्सर विकल्याची कबुली दिली. मलीक याने ती माती शौकीन इतजार सलमानी (वय – 45, रा. कुदळवाडी, चिखली, पुणे) यास विकल्याचे निष्पन्न झाले. त्याला सुध्दा दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त.नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक, अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, संजयकुमार दळवी यांनी केली आहे.




























































