Pune crime घरफोडीसह जबरी चोरी करणारे सराईत अटकेत, येरवडा पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येरवडा परिसरात घरफोडीसह जबरी चोरी करणार्‍या सराईतांना तपास पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 69 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राघु राजु घोरपोट (वय – 24) आणि अमर रामलु वाहेदलोग (वय – 25, दोघेही रा. सध्या सणसवाडी, ता. शिरुर, पुणे, मुळ पत्ता. चिखलठाणा ता. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोहनवाडी परिसरातील घरफोडीचा तपास येरवडा पोलिसांकडून सुरू होता. त्यावेळी चांदीचे दागिने चोरी करणारे दोघेजण गांधीनगर येरवडा परिसरात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार दत्ता शिंदे, नाईक कैलास डुकरे, प्रशांत कांबळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चार घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी उपायुक्त शशिकांत बोराटे, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, प्रदिप सुर्वे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, सागर जगदाळे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केली.