
मसाज पार्लरच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांना सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले आहे .बालेवाडी फाटा येथील कणक स्पा मसाज पार्लर मध्ये छापा टाकून 8 पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्याशिवाय 10 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बालेवाडीतील सुर्यप्रकाश बंगल्यात असलेल्या कणक स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी मालकीण आणि मॅनेजर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत 8 पिडीत मुलींची सुटका केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त श्रीनिवास घाडगे पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हनमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, संदिप कोळगे, प्रफुल्ल गायकवाड, राजश्री मोहिते, निलम शिंदे, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण यांनी केली.




























































