कासेवाडीतील कत्तल खान्यावर छापा; 3 गाईंना जीवदान, 6 टन गोमांस जप्त

कासेवाडीतील कत्तल खान्यावर युवासेनेने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दोन जिवंत गायी आणि पारड्याचा जीव वाचविला आहे. त्याशिवाय 6 टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. खडक पोलीसांनी शुक्रवारी (दि. 16) पहाटे कारवाई केली.

याप्रकरणी समीर जाफर कुरेशी (वय 48 सय्यदनगर हडपसर ) रज्जाक माइन कुरेशी (वय 29, रा. भवानी पेठ, ), यासिन वाजिद कुरेशी (वय 22, रा. कॅम्प ), शहाबाद शफीक कुरेशी (वय 25, रा. कसाई मोहल्ला, कॅम्प, ), हर्षद वाडेकर (वय 32, रा. भवानी पेठ, ), समीर कुरेशी (रा. कासेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर रिझवान कुरेशी (वय 35, रा. कोंढवा) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कासेवाडीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये गायींची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी शादाब मुलाणी, पीपल्स फॉर अ‍ॅडनिमल्सचे गोरक्षक निखील दरेकर, सचिन शित्रे, निलेश पवार, गणेश कामठे, मयूर शिंदे यांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये दोन जीवंत गायी आणि एक पारडू आढळून आले. त्यानंतर गायी आणि पारडाची गोशाळेत रवानगी केली. 3 टन गोमांस असलेले 2 टेम्पो पकडुन संबधित दुकानांवर कारवाई करण्यात आली. गाडीमध्ये 10 ते 15 गोवशांचे मांस कापलेल्या अवस्थेत मिळाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष मांस नष्ट करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत आणि पोलीस शिपाई आनंद गोसावी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या