नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरूणावर खुनी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून नऊ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर रॉडने मारहाण करून खूनी हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजु उर्फ डड्या संजय लोंढे (वय 25), मोन्या उर्फ जितेंद्र संजय लोंढे (वय 20), प्रशांत सुखदेव जाधव (वय 19), कृष्णा देवकुळे, विकास उर्फ विकी गायकवाड, सोमनाथ गायकवाड, ओम गायकवाड, रोहीत खुडे, नान्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू व मोन्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अथर्व रविंद्र अडसुळ (वय 18, रा. पद्मावती) याने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्वने आरोपींनी नशा करण्यासाठी पैसे दिले नव्हते. त्यामुळे सर्वजण त्याच्यावर चिडून होते. त्यातूनच टोळक्याने संगणमत करून बुधवारी रात्री अथर्वला रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करत खूनाचा प्रयत्न केला. टोळक्याने आम्ही येथील भाई आहोत, आम्हाला नडला तर असेच एक एकाला संपवून टाकू असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.