पुणे -महंमदवाडीतील हेवनपार्क खिंडीत तरुणाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीस्वार तरूणाला लुटल्याची घटना महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क खिंडीत घडली आहे. याप्रकरणी सचिन कांबळे (वय 29, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मागील शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास महंदवाडीतील हेवनपार्क खिंडीतून घरी निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या गाडीला कट मारून अडविले. कोयत्याचा धाक दाखवून त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या खिशातील रोख 1 हजार 200 रूपये, हातामधील चांदीची अंगठी असा ऐवज जबरदस्तीने काढून घेत पसार झाले. सचिन यांनी उशीरा येऊन तक्रार दिल्यामुळे चार दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.