पुण्यात भर रस्त्यात टोळक्याची तरुणाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुन्या भांडणाच्या रागातून चौघांच्या टोळक्याने तरुणाला उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. रोहित धोत्रे असे जखमी झालेल्योच नाव आहे. याप्रकरणी अमोल कोमरेकर (वय 26, रा. वडारवाडी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि अमोल मित्र असून वडारवाडी राहयला आहेत. दोन दिवसांपुर्वी दोघेही सेनापती बापट रस्त्याने दुचाकीवरुन चालले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून चौघांच्या टोळक्याने त्यांना हनुमाननगर परिसरात अडवून खाली पाडले. टोळक्याने रोहितला बॅटने आणि उलट्या कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. शिंदे तपास करीत आहेत.