पुण्यात कचरा प्रकल्प जाळपोळप्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात कचरा प्रकल्पातील कचरा पेटवून  पोकलेन यंत्राची तोडफोड करणार्‍या 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद पवार (वय 31,रा.  हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरात महापालिकेने ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा केला आहे.

संबंधित प्रकल्पाला स्थानिकांसह राजकीय पदाधिकार्‍यांचा विरोध आहे. त्याच रागातून रविवारी 15 ते 16 जणांनी कचरा प्रकल्पात आग लावून पोकलेन यंत्राची तोडफोड केली.

मिलींद पवार यांच्या मालकीचे पोकलेन असून त्याचे नुकसान, तोडफोड केल्यामुळे त्यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर तपास करत आहेत.