
सामना प्रतिनिधी। नेवासा
पोलिसांच्या मानसिक त्रासाला कंटाळून सलबतपुर ता नेवासा येथील सोनाराने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सुजित कपिले असे या सोनाराचे नाव आहे. संगमनेर येथील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने सोनारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
मंगळवारी पहाटे 5.30 ते 6.30 च्या दरम्यान पुणे पोलीस अधिकारी ,तीन पोलीस कर्मचारी गाडी क्रमांक एम एच 14 दि एन 9712 मधून कपिले यांच्या घरी आले होते. आत येताच त्यांनी कपिले यांना धक्का बुक्की करत सोन्याची मागणी केली. यापूर्वीही पोलिसांनी त्यांना असाच त्रास दिला होता. त्यामुळे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून पिकावर फवारणी करण्याचे औषध कपिले यांनी घेतले. त्यानंतर पोलीस गरबडले त्यांनी कपिले यास नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान सुवर्णकार समाजाचे संभाजी नगर जिल्हा संघटना प्रमुख सोपान मंडलिक यांनी नेवासा येथे भेट दिली आणि पुणे पोलिसाविरुद्ध निवेदन सादर करण्यास सांगितले.
तर पिंपरी चिंचवड पोलीस तपास करणारे अधीकारी काटे,उत्तम तांगडे म्हणाले की,जिल्ह्यातील घरफोडी तील सोमनाथ मधुकर चोभे रा अशोक नगर ,श्रीरामपूर याने दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी घर फोड्या केल्या असून कांही प्रमाणात चोरलेले सोने दिले आहे .मध्यप्रदेश येथून परत पुणे येथे जात असताना दोन दिवसांपूर्वी सलबतपुर येथे कपिले यांच्या घरी गेलो होतो. मात्र तो सापडला नाही मात्र आज सकाळी नोटीस बजावणी करण्यासाठी गेलों असता वडील पत्नी समक्ष त्याने विषारी औषध घेतले पुढील उपचारासाठी त्यास श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल केले प्रकृती स्थिर आहे.
































































