पुणे – कर्जाच्या बहाण्याने जेष्ठाला 10 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने जेष्ठ नागरिकाला तब्बल 10 लाखांचा गंडा घातला. ही घटना जून ते सप्टेंबर 2019 मध्ये खडकीतील रेंजहिल परिसरात घडली आहे. याप्रकरणी 63 वर्षीय जेष्ठाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कुटुंबीयांसह लोहगाव वाघोली रस्ता परिसरात राहायला आहेत. जून 2019 मध्ये फिर्यादींची ओळख तरूणासोबत झाली होती. त्यानंतर संबंधिताने फिर्यादीला कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रोसेसिंग फिच्या नावाखाली पैसे घेतले.

तुम्ही जेष्ठ नागरिक आहात, तुमचे अर्धे कर्ज माफ होणार आहे, असे सांगून विविध आमिष दाखवून आरोपीने जेष्ठाकडून वेळोवेळी मिळून 9 लाख 75 हजार रूपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तपास करीत आहेत.