पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुणे लोकसभेची जागा भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे 29 मार्च 2023पासून रिक्त आहे.

पोटनिवडणुकीच्या विलंबावरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासंदर्भातील पुढील सुनावणी सात आठवडय़ांनी होणार आहे. पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू, असे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.