
देशभरातील हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह… परदेशी धावपटूंची घटलेली संख्या… भल्या पहाटेचे आल्हाददायक वातावरण…नवीन सुटसुटीत मार्ग… आणि देशातील मॅरेथॉनची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 34व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱ्या वर्षी इथिओपियन धावपटूंचाचा बोलबाला बघायला मिळाला. पूर्ण मॅरेथॉन (42 किलो मीटर)आणि अर्ध मॅरेथॉन (21 किलो मीटर) या दोन्ही गटात इथिओपिन धावपटूंनी पहिले तिन्ही क्रमांक पटकावून निर्भेळ यश संपादन केले. फक्त महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये अपवाद ठरलेल्या केनियाच्या गथेरू हन्नाहने तिसरा क्रमांक पटकाविला.
हिंदुस्थानी मॅरेथॉनचे हे 100 वे वर्ष होय. त्यानिमित्ताने ३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनेला पहाटे पाच वाजता प्रारंभ झाला. यावेळी माजी खासदार सुरेश कलमाडी, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विशवस्त अभय छाजेड, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे, उपमहापौर सरस्वती शेडगे, स्पर्धा संयोजन सचिव सुमंत वाईकर, गुरुबन्स कौर, सचिन आडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेची सुरवात मुख्य ४२ किलोमीटरच्या शर्यतीने करण्यात आली. त्यानंतर 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि साडे तीन किलोमीटरची चॅरिटी रन सोडण्यात आली. याप्रसंगी रुदांग ढोल ताशा पथकाचे वादन, तसेच विभरत डान्स अकादमी यांची गणेशवंदना सादर करण्यात आली.
पुणे मॅरेथॉनचे निकाल :
पुरूष पुर्ण मॅरेथॉन
सोलोमन टेका (इथिओपिया)- 02:17.6
अबदू केबेबे (इथिओपिया)- 02:16.3
मेर्गा बेकेले (इथिओपिया)- 02:20.4
महिला पूर्ण मॅरेथॉन
यियेझू बेलायनेश शिपेâरा (इथिओपिया)- 02:43.6
सिमेंग थिलाहून पेâकेडे (इथिओपिया)- 02:58.3
हेई मेगेर्टू गेमेचू (इथिओपिया)- 02:59.1
पुरुष अर्ध मॅरेथॉन
हाईलू इतिचा हुसेसा (इथिओपिया) – 01:06.3
उर्गे कुबा इशेतू (इथिओपिया)- 01:07.1
हाईले मेंजिस्तू वोर्वâनेह (इथिओपिया)- 01:07.2
महिला अर्ध मॅरेथॉन
गाशू सम्रावित नेगा (इथिओपिया)- 01:17.6
तेपेरा कोलोने मेकाशू (इथिओपिया)- 01:18.1
गाथेरू हन्नाह वंजीरू (केनिया) – 01:21.1




























































