पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात चार मोबाईल चोरीला, चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये असुरिक्षतता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूकीचा कणा असलेल्या पीएमपीएल बसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गर्दीचा फायदा घेउन प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याच्या चार घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरिक्षतता आहे. याप्रकरणी फरासखाना, शिवाजीनगर आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ते मनपा असा प्रवास करणाऱ्याचा सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय मनपा येथे खराडी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी एका ज्येष्ठ व्यक्तींचा सहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत डांगेचौक ते कात्रज बसने प्रवास करणाऱ्या नागरिकाचा आठ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच स्वारगेट ते हडपसर बसप्रवासात चोरट्याने एकाचा 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.