पुण्यात परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांचा गुंता सुटणार कसा?

pune-police

गृहविभागाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तपदी राहूल श्रीरामे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांची कुठेही बदली करण्यात आली नाही. त्यामुळे एकाच परिमंडळासाठी दोन पोलीस उपायुक्तांचा गुंता सुटणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यानुसार मंत्रालय आदेशानुसार शहर वाहतूक पोलीस उपायुक्तपदी नियुक्त असलेले पंकज देशमुख यांची नियुक्ती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. त्यांच्या जागी प्रसाद अक्कानवरु यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर काल गृहविभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यानुसार परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तपदी राहूल श्रीरामे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांची बदली प्रस्तावित नसतानाही आता त्याच्या जागी राहूल श्रीरामे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील खात्यातंर्गत बदलीचा फटका नेमका कोणाला बसणार याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या