
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) दुसऱ्यांदा लग्नबंधनामध्ये अडकले आहेत. भगवंत मान यांनी डॉ. गुरप्रीत कौर (Dr Gurpreet Kaur) यांच्यासोबत विवाह केला. चंदीगढ येथे गुरुद्वारामध्ये आयोजित एका खासगी समारंभामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

48 भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. खासगी पद्धतीने पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात भगवंत मान यांच्याकडील 20 आणि डॉ. गुरप्रीत कौर यांच्याकडील 20 लोक सहभागी झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संजोयक अरविंद केजरीवाल हे या लग्नाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. केजरीवाल यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले.

भगवंत मान यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून त्यांची पहिली पत्नी इंद्रपीत आणि मुले अमेरिकेत राहतात. भगवंत मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आई हरपाल कौर यांना आपल्या मुलाने पुन्हा लग्न करावे, अशी इच्छा होती. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने स्वतः निवडलेल्या डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी झाला आहे.

भगवंत मान यांच्या लग्नाच्या तयारीची जबाबदारी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राघव चढ्ढा यांच्यावर होती. राघव चढ्ढा यांनी स्वत:च्या देखरेखेखाली सर्व तयारी केली. आईसोबत ते या विवाहसोहळ्याला हजर होते.

























































