शाळेत पंजाबी भाषा नाही शिकवली तर 2 लाख रुपयांचा दंड, मुख्यमंत्री चेन्नी यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मातृभाषेवरून पंजाबचे मुख्यमंत्री यांनी एक आदेश काढला आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत पंजाबी भाषा शिकवणे त्यांनी अनिवार्य केले आहे. अन्यथा दोन लाख रुपयांचा दंड आकारला जाईल असे आदेश मुख्यमंत्री चेन्नी यांनी दिले आहे.

पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यापूर्वीच मुख्यमंत्री चेन्नी ऍक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत त्यांनी पंजाबी शिकवण्याचे अनिवार्य केले आहे. जी शाळा किंवा संस्था या आदेशाचे उल्लंघन केले आहे त्यांना दोन लाख रुपयांचा दंड आकारला जाईल असे चेन्नी यांनी जाहीर केले आहे. तसेचन राज्यातील प्रत्येक फलकावर पंजाबी भाषेतला मजकूर शीर्ष ठिकाणी असावा असेही निर्देश दिले आहेत.