
पंजाब सरकारने सुरक्षा हटवल्यानंतर गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी येथील न्यायालयाने पंजाब सरकारला चांगलेच फटकारले आहे. मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच 424 जणांची सुरक्षा काढून घेतली होती. ज्या लोकांची सुरक्षा हटविण्यात आली त्यांची यादीदेखील लीक झाली होती. यावर न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून भगवंत मान सरकारला पुन्हा 424 जणांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे 7 जूनपासून या लोकांची सुरक्षा दिली जाणार आहे.


























































