पंजाबच्या संशोधकांनी बनवला 100 टक्के नैसर्गिक हेअर कलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकाली वयात अनेकांचे केस पांढरे होतात. हेयर डाय केल्यास त्यातील केमिकल्समुळे केस गळणे, आणखी पांढरे होण्याची समस्या निर्माण होते. याकर उपाय शोधताना पंजाब विद्यापिठाच्या संशोधकांनी 100 टक्के नैसर्गिक हेयर कलर शोधला आहे. विशेष म्हणजे जमिनीतील बॅक्टेरियापासून तो तयार केला आहे. त्याच्यामुळे कोणतेही साईट इफेक्ट होत नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

संशोधकांनी बॅक्टेरियाला वेगळं करून हा रंग तयार केला आहे. सुमारे सात वर्षे यावर संशोधन सुरू होते. पंजाब विद्यापीठाच्या मायक्रोबायलॉजी विभागाचे प्रा. गुप्ता यांच्या टीमने हे संशोधन केले. आता विद्यापीठाने पेटंटसाठी अर्ज केला आहे. सलूनमधून केस आणून प्रयोशशाळेत नैसर्गिक रंगाचे अनेक प्रयोग करण्यात आले. 10-12 वेळा शॅम्पू करूनही हा रंग जात नाही.