गुप्तरोगाच्या इलाजाच्या नावाखाली महागडय़ा औषधांची विक्री, बोगस डॉक्टरला अटक

873

वैद्यकीय पदवी नसताना दवाखाने थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱया मुन्नाभाईविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाईचा डोस देण्यास सुरुवात केली आहे. मालाड परिसरात वैद्यकीय पदवी नसतानाही गुप्तरोगाच्या नावाखाली महागडय़ा औषधांची विक्री होत असल्याची माहिती युनिट-12 ला मिळाली. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सागर शिवलकर, पोलीस निरीक्षक सचिन गवस, अतुल आव्हाड यांच्या पथकाने आमीरला मालाड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे वैद्यकीय परवाना नव्हता. गुप्तरोग बरा करण्याच्या नावाखाली तो बनावट औषधे रुग्णांना देत असायचा. त्याला अटक करून पुढील कारवाईकरिता दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात दिले.

कंपाऊंंडर झाला डॉक्टर

आमीर हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले. तो 7-8 वर्षे एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला कोणत्या गोळ्या द्यायच्या याची माहिती होती. त्यानंतर आमीरने मालाड येथील एका गल्लीत दवाखाना थाटला. तो रुग्ण पाहून पैसे घेत असायचा अशी माहिती समोर आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या