ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची तब्येत बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तज्ज्ञ डॉक्टरांची टिम त्यांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही माहिती बकिंघम पॅलेसकडून देण्यात आली आहे.

बकिंघम पॅलेसकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी केलेल्या तपासणीनंतर डॉक्टर त्यांच्या तब्येतीबाबत चिंतीत असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

महाराणी एलिझाबेथ कुठेही जाण्यायेण्यासाठी सक्षम नसल्याने त्या भेटीगाठी ब्रिटनच्या बंकिंघम पॅलेसऐवजी स्कॉटलंडच्या बाल्मोरस महालात करत आहेत.

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी सांगितले की, संपूर्ण देश या बातमीने चिंतेत पडला आहे. पुढे त्यांनी लिहीलेय, मी आणि युनायटेड किंगडम महाराणी आणि तिच्या कुटुंबासोबत आहोत असे ट्विट केले आहे.