लाल मातीचा सम्राट ‘नदाल’च, 12 वेळा जिंकली फेंच ओपन स्पर्धा

सामना ऑनलाईन । पॅरीस

रफाएल नदालने लाल मातीच्या कोर्टवरील किंग आपणच असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. स्पेनच्या या दिग्गज टेनिसपटूने अजिंक्य पदाच्या लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमला चार सेटमध्ये धूळ चारली आणि 12वेळा फेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. हे त्याचे सलग तिसरे फेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम जेतेपद ठरले. तसेच या वेळी एकूण 18व्या ग्रॅण्डस्लॅम अजिंक्य पदावर नाव कोरण्यात रफाएल नदालला यश मिळाले. रॉजर फेडररच्या सर्वाधिक 20 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदापासून तो आता दोनच पावले दूर आहे.

रफाएल नदालने पहिला सेट 6-3 अशा फरकाने खिशात घालत जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर मात्र डॉमिनिक थीमने दुसरा सेट 7-5 अशा फरकाने जिंकत बरोबरी साधली. डॉमिनिक थीमला मात्र हा फॉर्म कायम राखता आला नाही. त्याला तिसऱ्यासेटमध्ये 1-6 अशा फरकाने हार सहन करावी लागली. रफाएल नदालच्या झंझावाती खेळासमोर डॉमिनिक थीमची डाळ शिजली नाही. चौथा सेटही 6-1 अशा फरकाने जिंकत स्पेनच्या टेनिसपटूने बाजी मारली.

आपली प्रतिक्रिया द्या