
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ‘दि वॉल’ म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
48 वर्षीय द्रविड सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) काम पाहत असून यापूर्वीही त्यांनी श्रीलंकेच्या दौऱयावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. द्रविड 19 वर्षांखालील संघ आणि ‘हिंदुस्थान अ’ संघाला प्रशिक्षणही देत आहेत. द्रविड यांना मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही पहिलीच वेळ नाही; मात्र त्यांनी जुनिअर स्तरावर युवकांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिल्याने 2016 आणि 2017 साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. टी-20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्राr यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर टीम इंडियाला राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.



























































