राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, काँग्रेसमध्ये अध्यक्षीय मंडळ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-sad

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षदाचा राजीनामा देण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यावरही राजीनामा देण्यावर ते ठाम असून अध्यक्षीय मंडळाचा प्रस्ताव त्यांनी काँग्रेसपुढे ठेवला आहे. एक कार्यकारी अध्यक्ष आणि दोन कार्यकारी उपाध्यक्षांचे एक मंडळ तयार करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली आहे.

अध्यक्षीय मंडळाच्या प्रस्तावानुसार ज्योतिरादित्य सिंधिया आणि के. के. वेणुगोपाल यांच्या नावांची चर्चा कार्यकारी अध्यक्ष पदासाठी केली जात आहे. दरम्यान देशातील विविध राज्यांनी राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्ष म्हणून पुढील काळात काम पाहावे अशी मागणी करणारे ठराव स्थानिक पातळीवर करून ते दिल्लीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी गुरुवारी राजीनाम्याचा आग्रह न धरता राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी कायम राहाके असा किनंतीकजा ठराव एकमताने मंजूर केला.

काँग्रेसला पुढे नेण्यासाठी संघटनात्मक कामात बदल करण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी केल्या आहेत. पक्षाचा अध्यक्ष म्हणून ज्याच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल त्यास पूर्ण सहकार्य करू, पण आपल्याला अध्यक्षपद नको या भूमिकेवर राहुल गांधी आजही ठाम असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांनी सांगितले, मात्र ते भाजप आणि संघ विचारधारेच्या विरोधारील लढाई यापुढेही सुरूच ठेवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.