
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशाची पहिली फाळणी दहशतवादी बॅरिस्टर जिन्ना यांनी केली, आता दुसरी फाळणी कदाचित राहुल गांधी करतील; असा धक्कादायक आरोप अभिनेत्री कोयना मित्रा यांनी केला आहे. कोयनाने ट्विटरवरून राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये तिने काँग्रेसचा जाहीरनामा हा जिहादचे समर्थन करणारा व जवान व हिंदुस्थानविरोधी असल्याची टीका केली आहे.
First partition was done by Terrorist Jinnah, Next could be Rahul Gandhi.
Islamic flags welcomed him to #Kerala. Congress manifesto is pro jihad and anti jawans, anti India. Somebody is working hard for “Gazwa-e-Hind” pic.twitter.com/8YN1Yd5xiP— Koena Mitra (@koenamitra) April 4, 2019
या ट्वीटमध्ये कोयनाने राहुल गांधींचे केरळमध्ये स्वागत इस्लामचे झेंडे फडकवून केल्याचा दावाही केला आहे. त्याचा एक फोटो तिने शेअर केला आहे. मात्र कोयनाने शेअर केलेला तो फोटो राहुल गांधींच्या केरळ दौऱ्यावेळचा नसून तो इंडियन युनियन मुस्लीम लिगच्या 2016 च्या रॅलीचा असून त्यात या लिगचे झेंडे फडकवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कोयनाच्या या ट्वीटला संमिश्र प्रतिसाद मिळला असला तरी काही नेटकऱ्यांनी कोयनाला ट्रोल केले असून तिला इंडियन युनियन मुस्लीम लिग हा पक्ष तरी माहीत आहे का, असा सवाल केला आहे.



























































