
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना सातत्याने करत आहे. मात्र सत्तेत येऊन मोदी सरकारला सात वर्षे झाली. तरी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱया मोदी सरकारने सावरकरांना अद्याप ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले नाही, हे मोदी सरकारचे अपयश आहे, असे परखड मत शिवसेना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले.
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, मनपा गटनेते चंदू शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



























































