
रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी पासून ते ओव्हरब्रिज पर्यंत रेल्वेच्या लाईनच्या दोन्ही बाजूने असलेल्या राहत्या घरांना, दुकानांना व मोठ्या आस्थापनांना त्यांचे बांधकाम अतिक्रमण असल्याच्या नोटीसा दिल्या असून या रेल्वेच्या अन्यायकारक भूमिकेच्या विरोधात श्रीरामपुरात घर बचाव समितीने आज तहसील कचेरीवर मोर्चा काढला
श्रीरामपूर मध्ये पक्की घरे बांधण्यात आलेली आहे त्या घरांचा आता विषय ऐरणीवर आलेला आहे त्यातच आता अनेकांना नोटीस दिल्यामुळे अनेक कुटुंबाची आता वाताहात होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून नागरिक या ठिकाणी वसाहत करून राहत आहे त्यावेळी का बर कष्ट करून लोकांनी या ठिकाणी जागा घेतलेली आहे आता नव्याने रेल्वे मार्ग होणार असल्यामुळे अनेकांच्या जमिनी आता त्यामध्ये जाणार आहे त्यावेळेला नगर जिल्ह्यातील मनमाड दौड रेल्वे मार्गाचे दुहेरी करणाचे काम गतीने सुरु आहे. याच मार्गावर असलेल्या श्रीरामपूर शहरातुन जाणारे रेल्वे मार्गाच्या दुतर्फा रेल्वेची हद्द निश्चित करण्यात येत आहे. याची 1930 च्या नकाशानुसार हद्द निश्चित होती. असे असूनही यात मोठ्या प्रमाणावर जमिनी विक्री झाली. परिणामी आज इथे मोठी लोकवस्ती आहे. शेकडो पक्की घरे आहेत.
या सर्व मिळकत धारकांना रेल्वे प्रशासनाने आपली बांधकामे हटविण्याचा नोटीस दिल्या आहेत. या नोटिसींनी येथील मिळकत धारकांची झोप उडाली आहे . तर दुसरीकडे ज्या मूळ मालकांच्या जमिनी आहेत त्यांनी त्या जमिनी कशा पद्धतीने विकल्या व केव्हा विकल्या हा सुद्धा आता विषय पुढे चर्चेला आलेला आहे एकंदरीतच श्रीरामपूर या ठिकाणी आता रेल्वेच्या रुंदी करण्याच्या निमित्ताने अनेक विषय आता पुढे येऊ लागलेले आहेत.





























































