‘त्या’ इडली विक्रेत्यावर केली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात इडली विक्रेता चटणी बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाला होता. त्या व्हिडीओची दखल घेऊन इडली विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा बल आणि बोरिवली पोलिसांनी  दंडात्मक कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात लिंबू  सरबत विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच बोरिवली रेल्वे स्थानक परिसरातील इडली विक्रेत्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. तो चटणी बनवण्याकरिता शौचालयातील पाण्याचा वापर करायचा. एका व्यक्तीने हा प्रकार उघड केला होता. त्या व्हिडीओची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेतली. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे कायद्यानुसार तर बोरिवली रेल्वे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.