गो-गोवा विशेष रेल्वेने! नवीन वर्षानिमित्त पनवेल-मडगाव दरम्यान 14 विशेष गाडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांची पावले कोकणसह गोव्याच्या दिशेने वळू लागली आहेत. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर पनवेल-मडगाव दरम्यान 14 विशेष लोकल चालवण्याची निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– गाडी क्र. 01427 पनवेल–मडगाव ही विशेष गाडी 22 ते 31 डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्री 9.10 वाजता पनवेल येथून सुटणार आहे. z गाडी क्र. 01428 मडगाव – पनवेल गी गाडी 22 ते 31 डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता मडगावहून सुटेल. त्यांना रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी. येथे थांबा असणार आहे. z गाडी क्र. मडगाव – पनवेल ही गाडी 1 जानेवारी रोजी मजगाव जंक्शन येथून रात्री 9 वाजता पनवेलसाठी सुटेल. z 01429 ही गाडी पनवेल येथून 2 जानेवारी रोजी सकाळी 8.20 वाजता पनवेलहून सुटणार आहे.