रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2008 साली रेल्वे भरती दरम्यान झालेल्या आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा सांगत न्यायालयाने हा निकाल दिला.

रेल्वे नोकरभरतीसाठी 2008 साली कल्याणमध्ये विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर उमेदवार आले होते. रेल्वे स्थानकात काही उत्तर हिंदुस्थानी उमेदवारांना मराहाण झाली होती. या मारहाणीप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.