
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण (Rajesh Tope corona positive) झाली आहे. आज गुरुवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
दरम्यान, राज्यात आज 5427 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2543 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 40858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली.
त्रिसुत्रीचा अवलंब करा
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन ‘एसएमएस’ चा (सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा. सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन ‘एसएमएस’ चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021































































