स्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स

960
rajgira-otts-palak-pan-cake

pratik-poyrekar-chef>> शेफ प्रतीक पोयरेकर

शेफ प्रतीक पोयरेकर हे एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ या पदावर कार्यरत असून गेली 8 वर्षे या क्षेत्रात त्यांचा प्रगल्भ असा अनुभव आहे. ते इटालियन, फ्रेंच आणि कॉन्टिनेंटल पदार्थात निपुण आहेत. त्यांनी अनेक प्रतियोगितेमध्ये मोठ मोठी नामांकने कमावली आहेत. सामनाच्या वाचकांसाठी नवनवीन पदार्थांच्या रेसिपी आणणार आहेत.

आजचा पदार्थ: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स

साहित्य

1 कप ओट्स, 1/2 कप राजगिऱ्याचे पीठ किंवा राजगिरा, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा साखर, 1/4 चमचा दालचिनी पावडर, 2 कप दूधस, 1 केळे, 1 जुडी पालक, 1 चमचा व्हॅनिला अर्क,. 1चमचा बटर किंवा लोणी, 2, चमचे चॉकलेट चिप्स किंवा न्यूटेला, चवीनुसार मीठ

कृती

1. ओट्स आणि राजगिरा ब्लेंडरमध्ये घालून बारीक पावडर बनवा ब्लेंडरमधून मिश्रण वाडग्यात काढून घ्या.

2. नंतर पालक उकळून घ्या आणि थंड पाण्यात थंड करा, थंड झाल्यावर पाण्यातून काढा, व कोरडे करा.

3. राजगिरा आणि ओट्सचे पीठ, पालक, केळे, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स ब्लेंडरमध्ये बारीक करा. मिश्रण चिकट आणि घट्ट झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या.

4. त्या मिश्रणात चॉकलेट चिप्स एकत्र करा व ते पूर्ण नीट मिसळून घ्या.

5. एक नॉनस्टिक पॅन घ्या व तो गरम झाल्यावर त्यावर बटर किंवा लोणी लावा.

6. पुरेसे गरम झाल्यावर 2 मोठे चमचे पॅनवर ते मिश्रण पसरवा. एक बाजू नीट भाजल्यावर ते दुसऱ्या बाजूला परतवा.

7. दोन्ही बाजूंनी भाजल्यावर पॅनकेक एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि ते पॅनकेक न्यूटेलाबरोबर सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या