राजनाथ सिंह यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज विशाखापट्टणम युद्धनौकेच्या कमिशनिंगसाठी मुंबईत आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी सौ. रश्मी ठाकरे यांना फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात सर्व्हायकल स्पाइनची शस्त्र्ाक्रिया झाली असून ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. राजनाथ सिंह आज माझगाव डॉक येथे हिंदुस्थानी नौदलाच्या युद्धनौकेच्या लोकार्पणासाठी आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने व त्यांच्यावर झालेल्या शस्त्र्ाक्रियेबाबत कळल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सौ. रश्मी ठाकरे यांना पह्न केला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली.