
रजनी कुडाळकर यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या त्या पत्नी होत.
रजनी कुडाळकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आमदार कुडाळकर व त्यांच्या मुलाने तातडीने रजनी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूवींच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
रजनी कुडाळकर याच्ंया मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त समजताच शिवसैनिकांनी कुडाळकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
































































