राम मंदिर जानेवारी 2024 पासून खुले होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत उभारण्यात येत असलेले भव्य राम मंदिर जानेवारी 2024 पासून दर्शनासाठी खुले होणार आहे. सध्या मंदिराचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामांची मूर्ती बसवल्यानंतर जानेवारीपासून मंदिर भक्तांसाठी खुले होणार असल्याचे मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मंदिराच्या तळमजल्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.