Video- शिर्डीत भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिर्डी

साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाची शुक्रवारपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. शनिवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्यान शिर्डीत साई दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी जमली आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला जलाभिषेक घालून साईंचे मंगलस्नान पार पडले. मंगलस्नानानंतर साईबाबांना वस्र आणि विविध सोन्याच्या अलंकारांना सजवण्यात आले. भाविकांना दर्शन मिळणे सोयीचे जावे यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आले होते.