चेक क्लोन करून राम मंदिर ट्रस्टच्या खात्यातून काढले सहा लाख रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बँक खात्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज निधी जमा होत आहे. कोट्यवधी रुपये जमा झालेल्या हे खाते आता चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. गेल्या काही दिवसात या खात्याचा चेक क्लोन करून तब्बल सहा लाख रुपये काढल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ट्रस्टचे खाते हे बँक ऑफ बडोदा मध्ये आहेत. या ट्रस्टच्या खात्यातून 1 सप्टेंबरला पहिला 2.5 लाख आणि 3 सप्टेंबरला 3.5 लाख रुपये काढले. त्यानंतर आणखी एका चेकने साडे नऊ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही रक्कम मोठी असल्याने बँकेच्या मॅनेजरने या बाबात चंपत राय यांना सांगितले. तेव्हा चंपत राय यांनी आपण असा कोणताही चेक दिला नसल्याचे सांगितलेय त्यानंतर हा सगळा घोटाळा समोर आला. त्यानंतर चंपत राय यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.