
दलितांच्या मतांवर आरपीयआयचाही हक्क आहे, असे मत आरपीयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक राज्यात जनाधार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. म्हणून त्यांनी भाजपकडे आगामी निवडणुकीसाठी जागा मागितल्या आहेत.
मैनें BJP के राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा से बात की। फरवरी 2022 में आने वाले उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा और मणिपुर के चुनावों में ,उत्तर प्रदेश में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को 8-10 सीटें मिलनी चाहिए और बाकी राज्यों में 1-2 सीटें: केंद्रीय मंत्री रामदास अठावले pic.twitter.com/4BOBhZVej2
— ANI_HindiNews (@AHindinews) June 28, 2021
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले की, 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्याच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा सगळ्या राज्यात मोठा जनाधार आहे. म्हणून आम्हाला 8 ते 10 जागा मिळाव्या अशी मागणी आपण भाजपध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याकडे केली आहे.
RPI पार्टी का जनाधार हर राज्य में है। जे. पी. नड्डा ने बताया कि आपके प्रस्ताव पर विचार किया जाएगा। हमने उनको बताया कि बहुजन समाज पार्टी का वोट काटने से भाजपा को फायदा होगा। दलित वोटों पर RPI का भी अधिकार है: केंद्रीय मंत्री रामदास अठावले https://t.co/PpEVmNu9oY
— ANI_HindiNews (@AHindinews) June 28, 2021
उत्तर प्रदेशमध्ये बसपची मतं खाल्ल्यास भाजपलाच फायदा होईल, दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क असल्याचे आठवले यांनी नमूद केले. नड्डा यांनी जागावाटपाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आठवले यांनी सांगितले.
असादुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष उत्तर प्रदेशमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांनी 200 जागांवर निवडणूक लढवावी असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच एमआयएमने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवल्यास भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कुठलेही नुकसान पोहोचणार नाही असा दावाही आठवले यांनी केला आहे.
AIMIM 100 सीटों पर लड़ रहा है तो मेरा निवेदन है कि उन्हें 200 सीटों पर लड़ना चाहिए। AIMIM के लड़ने से भाजपा और एनडीए का नुकसान नहीं है: केंद्रीय मंत्री रामदास अठावले
— ANI_HindiNews (@AHindinews) June 28, 2021





























































