रमेश मोरे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे उपाध्यक्ष रमेश सखाराम मोरे यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेली 40 वर्षे सांस्कृतिक आणि नाटय़ क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोरे यांनी चंद्रलेखा नाटय़संस्थेचे व्यवस्थापक म्हणून अनेक वर्षे जबाबदारी पार पाडली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई, नातकंडे असा परिवार आहे.