
प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट हे लग्नबंधनात अडकले आहेत. कपूर खानदानाच्या वास्तू बंगल्यात हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला दोन्ही कडचे जवळचे नातेवाईक व मित्र मंडळी उपस्थित होते. पंजाबी पद्धतीने या दोघांचं लग्न झालं. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी रणबीरचे वडील ऋषी कपूर यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता.
सैफ अली खान, करिना कपूर, करिश्मा कपूर, करण जोहर, नव्या नवेली नंदा, श्लोका आणि आकाश अंबानी, अनिशा जैन आणि अरमान जैन, आकांक्षा रंजन, श्वेता बच्चन, अयान मुखर्जी हे या सोहळ्याला उपस्थित होते
View this post on Instagram
View this post on Instagram



























































