
देशभरात नवरात्रीचा उत्साह दिसत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त रामलीला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम लोकप्रिय असल्याने याला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. झारखंडमध्ये रामलीला कार्यक्रमात एक धक्कादायक घटना घडली आहे.
झारखंडमधील रांची शहरात रामलीला सुरू होती. यावेळी सीता स्वंयवराचे दृश्य सुरू होते. यावेळी स्टेजवर भगवान परशुराम यांचे आगमन होते आणि ते आवेशात शिवधुनष्य कोणी तोडले असा सवाल करतात. असा सवाल केल्यावर ते स्टेजवरच कोसळतात. अचानक काय झाले आहे, हे कोणालाच कळत नाही. भगवान परशुरामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हृदविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला असतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भगवान परशुराम यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव विनोद प्रजापती असे आहे. झारखंडमधील डंडई या लहान गावातले ते रहिवासी आहेत. अभिनयाची आवड असल्यामुळे छोट्यामोठ्या भुमिका साकारत त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यांच्या या कारकिर्दीत रामलीलामध्ये त्यांनी साकारलेली भगवान परशुरामाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून त भगवान परशुरामाची भूमिका ते साकारत आहेत.
झारखंडची राजधानी रांची मध्ये रामलीलाचा खेळ सुरु होता. मंचावर रामायणातील सीता स्वयंवर सुरु असताना शिवधनुष्य तोडल्याचा एक प्रसंग आहे. त्यात भगवान परशुरामाच्या भूमिकेत विनोद प्रजापती यांची मंचावर एंट्री होते. आणि ते मोठ्याने ओरडतात हा शिवधनुष्य कोणी तोडला ? आणि अचानक ते स्टेजवरच कोसळतात. त्यांना तातडीने रुग्णायलात नेण्यात येते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तपासणी करून डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात. हृदविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर सांगतात. या घटनेने सर्वांना धक्का बसतो. एक चांगला कलाकार आणि समासेवक गमावल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

























































