घरातली साडेसाती घालविण्याच्या बहाण्याने राणीहार चोरला, नंदुरबारच्या कळमदेव यात्रेत आरोपी फोटो विकताना सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काळी, पांढरी हळद, जडीबुटी व मंत्राच्या सहाय्याने घरातली साडेसाती, वादविवाद चुटकीसरशी घालवू अशी बतावणी करत एका घरकाम करणाऱया महिलेला एका दांपत्याने फसवले. हळद, जडीबुटीमध्ये घरातले सोने ठेवण्यास सांगून आरोपीने हातचलाखीने महिलेचा दोन तोळय़ाचा राणाहार लांबवला. पण पंतनगर पोलिसांनी नंदुरबार येथील कळमदेवाच्या जत्रेत जाऊन आरोपींना पकडले.

पंतनगर परिसरात रवी उईके (45) आणि त्याची पत्नी मीनाबाई (40) यांनी हळद, जडीबुटीचा स्टॉल लावला होता. 21 तारखेला गुरुनानक नगरात राहणाऱया अनिता महाडिक (40) त्यांच्या स्टॉलजवळ गेल्या. तेव्हा काळी, पांढरी हळद, जडीबुटी व मंत्राच्या सहाय्याने आम्ही घरातली ईडापिडा दूर करतो असे मीनाबाईने त्यांना सांगितले, पण त्यासाठी घरी यावे लागेल असेही ती म्हणाली. त्यानंतर अनिता यांनी उईके दांपत्याला आपल्या घरी बोलावले. मीनाबाई घरात गेली तर रवी पहारा देण्यासाठी बाहेरच उभा राहिला. घरात फारच साडेसाती आहे असे उगाच घाबरवत मीनाबाईने हळद, जटीबुटी काढून त्यात सोनं ठेवायला सांगितले.

अनिता यांनी ती सांगेल त्याप्रमाणे ऐकले आणि आपला दोन तोळय़ाचा सोन्याचा राणीहार त्यात आणून ठेवला. त्यानंतर मीनाबाईने बोलण्यात गुंतवून शिताफीने तो हार काढून तेथे बनावट हार ठेवला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच अनिता यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार दिली.

आरोपी जत्रेत फोटो विकताना सापडले
फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय किरण खरात तसेच शिंदे, चव्हाण, अनुसे, दळवी, सोनावणे, हाडवले या पथकाने तांत्रिक बाबींच्या माध्यमातून तपास सुरू केला. तेव्हा आरोपींचे लोकेशन धुळय़ात दाखवले. पथक लगेच धुळय़ाला रवाना झाले. मग धुळे ते नंदुरबार असे आरोपींचे लोकेशन मिळू लागले. अखेर मालापूरजवळील डोंगराळ भागात असलेल्या कळमदेवच्या यात्रेत ते असल्याची माहिती मिळाली. यात्रेत हजारो लोकांची गर्दी झाली होती. मात्र तरीही खरात व पथकाने चिकाटीने शोधमोहीम राबवत तेथे पह्टो विकत असताना मीनाबाई आणि रवी यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडले.