
अभिनेता रणवीर सिंह हा लवकरच शाहरुख खान आणि सलमान खान यांचा शेजारी होणार आहे. नुकताच वांद्रे येथे त्याने 119 कोटी रुपयांना एक क्वाड्राप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. रणवीरची ही नवीन प्रॉपर्टी बॅण्डस्टँड येथील बीजे रोडवर सागर रेशम नावाच्या इमारतीत 16,17,18 आणि 19 व्या मजल्यावर आहे. ‘ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी’ने या क्वाड्राप्लेक्ससाठी करार केला आहे. रणवीर सिंहच्या बाजूने व्यवहार करणारी कंपनी त्याच्या वडिलांच्या मालकीची आहे. रणवीरच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे तर रोहित शेट्टी याच्या ‘सर्कस’ तसेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात तो झळकणार आहे. आगामी ‘शक्तिमान’ या चित्रपटासाठी त्याला ऑफर मिळाल्याचीही चर्चा आहे.
19 गाडय़ांची पार्किंग; भव्य टेरेस गार्डन
रणवीरच्या घराचे एकूण क्षेत्रफळ 11 हजार 266 चौरस फूट असून या घरात 1300 चौरस फुटांचे टेरेस गार्डन आहे. त्यासोबत 19 गाडय़ांसाठी पार्किंगची जागाही देण्यात आली आहे. नवीन प्रॉपर्टीसाठी त्यांनी 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.


























































