उगाच जगाला तमाशा कशाला? रावसाहेबांना खिडक्या बंद कराव्या लागल्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

शनिवारी भुसावळातही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच राडा झाला होता. खडसे समर्थकांनी दानवेंना एवढे सुनावले की, ‘उगाच लोकांना तमाशा कशाला.’ हॉलच्या खिडक्या आधी बंद करा रे बाबांनो!’ असे म्हणण्याची वेळ दानवेंवर आली. भुसावळच्या मेळाव्यात अर्धा तास हा सं‘वाद’ सुरू होता.

एकनाथ खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश कधी करणार? खडसेंना डावलाल तर भाजपला किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच कार्यकर्त्यांनी दानवेंना दिला. यावेळी एकनाथ खडसेसुद्धा उपस्थित होते… गालातल्या गालात हसत! नंतर जळगावात पत्रकारांनी याबाबत दानवेंना छेडले असता ते संतापले. म्हणाले, आमची पार्टी आम्हाला चालवू द्या ना. तुम्ही कशाला चालवताय?