ओडिशामध्ये आढळला दुर्मीळ काळ्या पट्ट्याचा वाघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशामध्ये एक अतिशय दुर्मीळ काळ्या पट्ट्याचा वाघ आढळला आहे. 13 वर्षानंतर असा वाघ दिसला आहे.

ओडिशाच्या जंगलात दुर्मीळ काळ्या पट्ट्याचा वाघ आढळला आहे. राज्यात अशा प्रकारचे केवळ 7-8 वाघ उरले आहेत. संपूर्ण जगातील काळ्या पट्ट्यांच्या वाघांपैकी एकूण 70 टके वाघ हे ओडिशामध्ये आहेत. 2007 साली ओडिशाच्या व्याघ्र प्रकल्पात हा आढळला होता.

black-tiger-2

या वाघाला मेलेनिस्टिक वाघ असे म्हणतात. अनुवांशिक दोषांमुळे अशा प्रकारचे पट्टे वाघाच्या शरीरावर तयार होता. 2018 च्या वाघांच्या गणनेनुसार अशा प्रकारच्या वाघांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या वाघांचा आकार सामान्य वाघांपेक्षा छोटा असतो. हिंदुस्थानात पहिल्यांदा 1990 साली हा वाघ सापडला होता.