Astrology । Horoscope । 2 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी

दिन विशेष – गुरुवारी सर्वार्थ सिद्धि योगासह रवि योग हे शुभयोग होत आहेत. आजचा दिवस मिथुन, कन्या आणि कुंभ राशींना उत्तम राहणार आहे. कुटुंबातील वातावरण उत्साहाचे असेल आणि भाग्याची चांगली साथही मिळणार आहे.

मेष
आजच्या दिवसात कामासाठी दगदग होणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. आजच्या दिवसात महत्त्वपूर्ण बैठका, चर्चा, भेटीगाठी यावर लक्ष केंद्रीत करावे. विरोधक गुप्त कारवाया करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबियांसाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे.

वृषभ
वृषभ राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. घरातही उत्साहाचे वातावरण असेल. घरात काही खरेदी किंवा एखादी वस्तूंची खरेदी करावी लागणार आहे. मात्र, कोणताही निर्णय घेताना कोणाचीही नाराजी ओढवणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

मिथुन
मिथुन राशीवाल्यांना आजचा दिवस स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी उत्तम आहे. आज अनेकांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकाल. मात्र, फसवणूक होणार नाही यासाठी भागीदारांपासून सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळणार असल्याने घरातील वातावरण चांगले राहील. घरातील व्यक्तींशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.

कर्क
कर्क राशीच्या समस्या आजच्या दिवशी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवावे आणि वागण्या-बोलण्यात स्पष्टता ठेवावी. आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी. तसेच आजच्या दिवसात खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक गणीत ठरवूनच पैसे खर्च करावेत. तसेच कोणालाही शब्द देऊ नये. त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्क राशींच्या लोकांनी आज सतर्क राहण्याची गरज आहे.

सिंह
सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा आहे. करिअरबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अनेक समस्यांवर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. स्पर्धा-परीक्षांसाठी आणि खेळांडूसाठीही आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात जाण्यासाठी निर्णय घेण्याची ही योग्यवेळ आहे. त्याचा भविष्यात फायदा होणार आहे.

कन्या
कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. मात्र, इतरांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे योजना आखूनच पैसे खर्च करावेत. आज सहकाऱ्यांकडून चांगली मदत होणार आहे. कुटुंबियांना दिलेला शब्द पाळावा लागेल. तसेच आजच्या दिवसात शुल्लक गोष्टींवरून किंवा विनाकारण वाद घालणे टाळावे.

तूळ
तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तूळ राशीला धनलाभाचे योग आहेत. आज सर्व क्षेत्रात यश मिळण्याचे वातावारण आहे. आजच्या दिवसात भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या नवीन गोष्टीची सुरूवात करण्यासाठीही उत्तम दिवस आहे. कुटुंबियासोबत फिरायला जाण्याने कुटुंबातील आनंद वाढणार आहे.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्या धीराची परीक्षा घेणारा ठरणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जोखमीच्या कामापासून लांब राहवे. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. आज व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे आजच्या दिवसाच्या कामकाजाचे वेळापत्रक बनवावे म्हणजे ऐनवेळी कामाचा बोजा वाढणार नाही. आजच्या दिवशी आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये.

धनू
धनू राशीसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. भागीदारीतील कामात फायदा होणार आहे. तसेच सहकाऱ्यांकडूनही मदत होणार आहे. कोणतीही खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे. विरोधक कारवाया करण्याची शक्यता आहे. मात्र, नशिबाची साथ असल्याने त्यांचे काही चालणार नाही. योग्य ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेतल्याने भविष्यात उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे.

मकर
मकर राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. गरजेच्या वस्तूशिवाय इतर खरेदी करणे टाळावे. मात्र, कोणाच्याही सांगण्यावरून एखादी गोष्ट केल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज अधिकारी वर्गाकडून प्रशंसा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना एखादी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून व्यवसायातील समस्या दूर होणार असल्याने मनावरील दडपण कमी होणार आहे.

कुंभ
कुंभ राशींना आजचा दिवस चांगला जाणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आजच्या दिवसात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य मिळणार आहे. तसेच कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची गरज आहे. तुमच्याकडून वेगाने काम होत असल्याने सहकाऱ्यांकडून कौतुक होणार आहे.

मीन
मीन राशीसाठी आजचा दिवस सुख-समाधानाचा आहे. मात्र, गोष्टीत घाई गडबड करणे टाळावे. कार्यस्थळी एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच दिवाळीच्या काळात वाहन आणि गृहखरेदीबाबात महत्त्वाचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. मात्र, कोणालाही दुखावणे टाळावे. तसेच प्रलंबित कामांकडे लक्ष देत ते पूर्ण करण्यावर भर द्यावा.