
भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भीमा-कोरेगाव आयोगापुढे दोन दिवस साक्ष नोंदविण्यात येणार होती. त्यानुसार आज पहिल्या दिवशी त्यांनी आयोगापुढे हजेरी लाकली. मात्र यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांची साक्ष नोंदविण्यात आली नाही. सुनावणीची पुढची तारीखही निश्चित झाली नसल्याची माहिती सरकारी वकील शिषिर हिरे यांनी दिली.
मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये दोन दिवस आयोगापुढे साक्ष नोंदविण्यात येणार होती. सन 2018मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांची चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे. रश्मी शुक्ला आज आयोगासमोर हजर झाल्या असल्या तरी शपथपथी दाखल करण्यासाठी त्यांनी आयोगाकडे वेळ मागितला. भीमा-कोरेगाव कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचे त्यांनी आयोगापुढे सांगितले. दरम्यान, त्यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर असलेले परमबीर सिंह यांनाही समन्स बजाकण्यात आले होते; परंतु ते हजर झाले नाहीत. त्यावेळी सिंग हे अतिरिक्त पोलीसंचालक या पदावर होते.



























































