
मुंबईची पाकिस्तानशी तुलना करुन मुंबईचा अपमान करणारी आणि मुख्यमंत्र्यांच्या एकेरी भाषेत उल्लेख करणारी अभिनेत्री कंगना राणावत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना एकेरीत संबोधणाऱया अर्णब गोस्वामी यांचा आज रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध करण्यात आला.
आज कै.शामराव पेजे सभागृहात रत्नागिरी जि.प.ची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या सुरुवातीला जि.प.अध्यक्ष रोहन बने आणि बांधकाम सभापती महेश म्हाप यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या निषेधाचा ठराव मांडला. अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद आजच्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत उमटले. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ या पत्रकार अर्णव गोस्वामीचाही जाहीर निषेध केला आहे. यावेळी उपाध्यक्ष महेश नाटेकर, महिला आणि बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, शिक्षण सभापती सुनिल मोरे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, गटनेते उदय बने आणि इतर सदस्य उपस्थित होते.
महावितरणचे जि.प.गटनिहाय मेळावे घ्या
महावितरणच्या वाढीव वीजबीलाबाबत जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. अनेकांची वीजबिले भरमसाठ आल्याची तक्रार सदस्य बाळ जाधव, परशुराम कदम यांनी मांडली. वीजबिलांबाबत प्रत्येक जि.प.गटनिहाय महावितरणने मेळावे घ्यावेत अशी मागणी सदस्यांनी केली. अध्यक्ष रोहन बने यांनीही 15 सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधिकाऱ यांना जिल्हा परिषदेत उपस्थित राहून जि.प.गटनिहाय मेळाव्याचे नियोजन करावे अशी सूचना मांडली.






























































