मराठी तरुणांना मुंबई, पुणे, गुजरातमधील कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस आणि अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्यावतीने बुधवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे़. मुंबई, पुणे, नाशिक आणि गुजरात राज्यातील कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मराठी तरुणांना या रोजगार मेळाव्यात उपलब्ध होणार आहे़.

रोजगार मेळाव्यात स्कील फाऊंडेशनचे संचालकं प्रदिप तुपे मार्गर्दन कंरणार आहेत़. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ़ प्रवीण मुंढे उपस्थित राहणार आहेत़ रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची पात्रता किंमान दहावी उत्तीर्ण, पदवीधारकं, डिप्लोमाधारकं असून तरुणांनी सोबत येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, मूळ आणि झेरॉक्सच्या प्रती, वाहन चालवण्याचा परवाना, बँकं खात्याचे पासबुक आ सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेऊन याव्यात असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे़.